केंद्र सरकारचा निष्काळजीपणा चिंताजनक असल्याचे राहुल गांधी म्हणाले. त्यांनी ट्विटरवरून सरकारवर हल्लाबोल केला. यापूर्वी त्यांनी १४ ऑगस्ट रोजीही यासंदर्भात ट्विट केलं होतं. “भारत करोना लसीचं उत्पादन करणाऱ्या देशांपैकी एक असेल. परंतु ही लस सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी एक सर्वसमावेश रणनीती आखायला हवी,” असं राहुल गांधी म्हणाले होते
देशात दिवसेंदिवस करोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशात ७५ हजारांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद झाली असून करोनाबाधितांची संख्या आता ३३ लाखांच्या वर गेली आहे. करोनाच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर देशातील जनता लसीच्याही प्रतीक्षेत आहे. यावरून आता काँग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. “आतापर्यंत एक निष्पक्ष आणि सर्वसमावेशक कोविड लसीची रणनीती असायला हवी होती, परंतु अद्याप त्याचे कोणतेही चिन्ह दिसत नाही,” असं राहुल गांधी म्हणाले.