नांदेड, दि २६: ( प्रतिनिधी ) नांदेड नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील अर्धापूर शहराच्या वळण मार्गावर भरधाव वेगातील ट्रकने दुचाकीला चिरडल्याने दोन जण जागीच ठार झाले. ही घटना आज दि. २६ ऑगस्टला सकाळी अकरा वाजताच्या सुमारास घडली.
(सोलापूर येथे ३१७७ जागांची भरती २०२०)
या घटनेची महामार्ग पोलीसाकडून मिळालेली माहिती अशी, की नांदेड-नागपूर महामार्गावर (क्र- एम.एच.३८ ए ४३१०) ही मोटारसायकल नांदेडकडे येत असताना भरधाव वेगातील ट्रकने (क्र.एम. पी.०९, ए. एच.०९२८) दुचाकीला जबर धडक दिली. यात दुचाकीवरील बालाजी नामदेव इमने (वय-२१ व रा. तरोडा खु. ता.हदगाव) व अन्य एक असे दोघे जण जागीच ठार झाले आहेत.