चोरट्यांकडून घरात घुसून महिलेवर कोयत्याने वार

किल्लेधारूर दि.२६(प्रतिनिधी) शहरातील आझादनगर भागातील एका महिलेवर चोरट्यांनी पहाटे चारच्या सुमारास घरात घुसुन कोयत्याने हल्ला करत लुटण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. त्या महिलेस येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात हलवण्यात आले. सतत घडणा-या चोरीच्या घटना या पोलिंसासमोर आव्हान ठरत आहेत.

(MPSC परीक्षा पुन्हा पुढे ढकलल्याने लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान: मनविसे.)


काल शहरातील गिता ज्ञान आश्रमात चोरट्यांनी धुडगूस घातल्याची घटना ताजी असताना दुसऱ्याच दिवशी सदरील घटना घडली आहे. शहरातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळा परिसरातील आझाद नगर व नाथ नगर भागातील रहिवाशी या घटनेमुळे भयभीत झाले आहेत. या भागातील हुसेनाबी नवाब शाह या महिलेवर पहाटे हा हल्ला झाला. येथील ग्रामीण रुग्णालयात महिलेवर प्राथमिक उपचार करुन अंबाजोगाईला हलवण्यात आले आहे.

(भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ पुणे येथे विविध पदांच्या भरती २०२०.)

पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु आहे. ऐन सणासुदीच्या काळात घडत असलेल्या चोरीच्या घटना पोलिसांसाठी आवाहन ठरत आहे. सहाय्यक पोलिस निरिक्षक सुरेखा धस यांनी घटनास्थळी जावून सखोल चौकशी सुरु केली आहे. या प्रकरणी एका संशियीतास ताब्यात घेतले असून चौकशी सुरु असल्याचे धस यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!