छोट्याशा देशाने कोरोनावर लस बनविली; साईड इफेक्ट शून्य

कोरोना व्हायरसच्या मुद्द्यावर चीनला भिडणाऱ्या छोट्याशा ऑस्ट्रेलियाने देखील लस तयार केली आहे. डेली मेलच्या वृत्तानुसार ऑस्ट्रेलियाची लशीची पहिली मानवी चाचणी यशस्वी झाली असून याचे कोणतेही साईड इफेक्ट दिसून आले नाहीत. ऑस्ट्रेलिया केवळ 2.5 कोटी लोकसंख्येचा देश आहे.

गेल्या महिन्यात क्विन्सलँड विद्यापीठ आणि बायोटेक कंपनी CSL ने ब्रिस्बेनमध्ये 120 व्हॉलेंटिअरना कोरोना लस टोचली होती. या मोहिमेवर काम करणारे सहाय्यक प्राध्यापक कीथ चॅपेल यांनी सांगितले की, युरोपमध्ये Viroclinics-DDL कडून या लसीची प्राण्यांवरही चाचणी करण्यात आली. यामध्ये देखील कोणतेही साईड इफेक्ट दिसलेले नसून ही चाचणी यशस्वी झाली आहे. संशोधकांनी सांगितले की, ऑस्ट्रेलियामध्ये करण्यात आलेल्या या चाचणीमध्ये माणसांवर कोणतेही साईड इफेक्ट दिसून आले नाहीत. जगभरात कोरोनाच्या 17 लसीं आघाडीवर आहेत. या लसींची चाचणी घेतली जात आहे. ऑस्ट्रेलियात घेतली गेलेली चाचणी या लसींपैकीच एका लसीची होती. जगभरात 130 लसींवर संशोधन केले जात आहे. ऑस्ट्रेलियाच्या क्विन्सलँड विद्यापीठाने त्यांच्या कोरोना लसीवरील प्री क्लिनिकल डेव्हलपमेंटच्या स्टेजचे परिणार जाहीर केले आहेत. यामध्ये ही लस यशस्वी झाली आहे. ऑस्ट्रेलियाने ब्रिटनची कंपनी अॅस्ट्राझिनेकासोबत ऑक्सफर्डच्या कोरोना लसीच्या खरेदीसाठी करार केला होता. जर ऑक्सफर्डची लस यशस्वी झाली तर ऑस्ट्रेलियाला पहिल्या टप्प्यात लस मिळू शकते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!