माजी कृषीमंत्री सदाभाऊ खोत यांना करोनाची लागण झाली आहे. सदाभाऊ खोत यांची करोना चाचणी पाॅझिटिव्ह आली असून त्यांनी स्वत: याबद्दल माहिती दिली. ते होम क्वॉरनटाईन झाले आहेत. फेसबुक पोस्टद्वारे त्यांनी ही माहिती दिली.
माझी कोवीड19,पाॅझिटीव आली आहे मी आता उतम आहे,व मी क्वॉरनटाईन,झालो आहे,तरी आपण आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या,गणेशरायच्या व आपल्या सर्वाच्या आशीर्वादाने लवकरच आपल्या सेवेत हाजर राहीन, धन्यवाद सदाभाऊ खोत अशी फेसबुक पोस्ट लिहून सदाभाऊ खोत यांनी करोनाची लागणी झाल्याची माहिती दिली.