जेईई-नीट परीक्षांसाठी सेंटर्स वाढवले

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून जारी केलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे की, जेईई परीक्षा एक ते 6 सप्टेंबर दरम्यान होईल आणि नीट परीक्षा 13 सप्टेंबर रोजी होणार आहे. जेईई मुख्य परीक्षांसाठी नंबर ऑफ शिफ्ट्स देखील वाढवल्या आहेत. आधी या परीक्षेसाठी आठ शिफ्ट निश्चित केल्या होत्या. आता त्या वाढवून 12 केल्या आहेत.

जेईई मुख्य परीक्षांसाठी अॅडमिट कार्ड देखील रिलिज करण्यात आली आहेत. नीट 2020 परीक्षांसाठी देखील अॅडमिट कार्ड या आठवड्यात रिलिज होण्याची शक्यता आहे. एनटीएकडून अॅडमिट कार्ड रिलिज करतेवेळी सांगण्यात आलं होतं की, जवळपास 99 टक्के विद्यार्थ्यांना त्यांनी निवडलेली परीक्षा केंद्रं देण्यात आली आहेत.

जेईई मेन्स आणि नीट परीक्षा 2020 टाळणं शक्य नाही असं नॅशनल टेस्टिंग एजन्सीने स्पष्ट केलं आहे. येत्या 13 सप्टेंबरला नीट परीक्षा पार पडणार आहे. मात्र अजूनही ही परीक्षा स्थगित करण्याची मागणी केली जात आहे. मात्र आता कोणत्याही परिस्थितीत परीक्षा जास्त टाळू शकत नाही असं सरकारने स्पष्ट केलं आहे. एनटीएने परीक्षा सेंटर इत्यादींच्या बाबतीत आधीच विद्यार्थ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. अॅडमिट कार्ड रिलीज झाल्यानंतर ntaneet.nic.in या वेबसाईटवरून हे अॅडमिट कार्ड डाऊनलोड करता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!