महाड इमारत दुर्घटनेवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी दु:ख व्यक्त केलं आहे. एनडीआरएफच्या डीजींशी संवाद साधला आहे. दुर्घटनेतील लोकांना वाचवण्यासाठी शक्य तितकी मदत करण्यात येत आहे, असं अमित शहांनी म्हटलं आहे.
NDRF च्या टीम घटनास्थळी थोड्याच वेळात पोहचून लवकरच रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात होईल, सर्वाच्या सुरक्षेसाठी मी प्रार्थना करतो, असं ट्विट अमित शहांनी केलं आहे.
दरम्यान, पत्त्याची इमारत कोसळावी, तशी ही इमारत कोसळली. यावेळी धुराचा मोठा लोट पसरला दुर्घटनाग्रस्त इमारत ही अंदाजे 10 वर्षे जुनी असल्याचं सांगितलं जात आहे.