सोनिया गांधी यांच्या हंगामी अध्यक्षपदाला एक वर्षे पूर्ण झाल्याने नव्या अध्यक्ष निवडीची चर्चा सुरु झाली होती. अशातचं पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांनीच पक्षाच्या अवस्थेबद्दल जागृत करणारं पत्र सोनिया गांधींना लिहिण्याचं धाडस दाखवलं. त्यामुळे अधिकचं गुंता निर्माण झाला होता. मात्र, अखेर सोनिया गांधी यांचीच 6 महिन्यांसाठी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील सहा महिन्यात नव्या अध्यक्षांची निवड होणार आहे.
सात तासानंतर अखेर काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक संपली असून सोनिया गांधी तूर्तास हंगामी अध्यक्ष पदावर कायम राहणार आहेत. पुढच्या 6 महिन्यात काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांची निवड होणार आहे. सोनिया गांधींना मदतीसाठी 4 सदस्य कमिटी बनवणार असून जी दैनंदिन कामकाजात मदत करणार आहे.