नवी दिल्ली | गांधी कुटुंबाव्यतिरिक्त दुसऱ्याला अध्यक्ष पद द्यावं अशी भूमिका सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी घेतली आहे. काँग्रेसमध्ये नेतृत्वाच्या मुद्यावरुन दोन गट पडले आहेत.
दिल्लीत याच मुद्यावरुन अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या कार्यालयाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांची घोषणाबाजी सुरु आहे. काँग्रेस अध्यक्ष गांधी कुटुंबातूनच असला पाहिजे अशी या कार्यकर्त्यांची मागणी आहे. आम्हाला पक्षाध्यक्ष गांधी कुटुंबातूनच हवा, कुठल्या बाहेरच्या व्यक्तीला अध्यक्ष बनवले तर पक्षात फूट पडेल, पक्ष संपून जाईल, असं काँग्रेस कार्यकर्ते जगदीश शर्मा यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मला हंगामी अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा आणि नव्या अध्यक्ष पदाच्या निवडीची प्रक्रिया सुरू करा, असं सोनिया गांधींनी म्हटलं आहे.