बीड दि.23 (प्रतिनिधी): बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा अधिनियम २००९ अंतर्गत खागगी विनाअनुदानित, स्वयं अर्थसहाय्यित शाळेमध्ये प्रवेशाच्या पहिल्या वर्गासाठी एकुण २५% जागा राखुन ठेवुन आरक्षित करण्यात येतात आणि त्या वंचित गटातील आणि दुर्बल गटातोल पात्र लाभाथ्यांना मोफत प्रवेश देण्याचे कायदयाने बंधनकारक केलेले आहे.त्यानुसार 31 ऑगस्ट पहिल्या निवड यादीची अंतिम तारीख जाहीर करण्यात आली आहे.
शैक्षणिक वर्ष सन २०२०-२१ या वर्षासाठी बोड जिल्हयातील २२६ शाळांनी ऑनलाईन नोंदणी केलेली आहे. २९२६ प्रवेशाच्या जागा निश्चित केलेल्या आहेत व त्यासाठी पालकांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आलेले होते. जवळपास ६८९५ अर्ज प्राप्त झालेले आहेत. दिनांक १७/०६/२०२० रोजी राज्यस्तरावर प्रवेशाची लॉटरी काढण्यात आलेली आहे. यामध्ये बीड जिल्हयातील २९२६ जागाचो ग्रवेश क्षमता निश्चित केली आहे तर १६६८ विद्याच्य्यांची प्रतिक्षा यादीही जाहीर करण्यात आलेली आहे. सर्व निवड यादीतील पात्र विद्यार्थ्याना पालकांना एसएमएस पाठविण्यात आलेले आहेत परंतु कोविड-१९ च्या पार्श्वभुमीमुळे लॉकडाऊन असल्याने प्रवेशाचे वेळापत्रकाप्रमाणे कामकाज होऊ शकले नाही.
शासनाने शैक्षणिक वर्ष २०२० – २१ हे दिनांक १५ जून २०२० पासून सुरु झालेले आहे. सद्यस्थिती पालकांना शाळास्तरावरुन प्रयोजनल प्रवेश देण्यासाठी दिनांक २४ जून २०२० पासन प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन वेबसाईटवर संधी उपलब्ध करुन दिलेली आहे. प्रत्येक पालकांना एसएमएस पाठविलेले आहेत. शाळांनी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. निवड यादीतील प्रत्येक पालकांना फोन संदेश दिलले आहेत. तीन बेळा संबंधित पालकांना प्रवेश घेण्याबाबत संधी दिलेली आहे. तरीही आजपर्यन्त शाळास्तरावर ग्रोव्हिजनल अॅडमिशन १९५२ झाले आहेत तर गटशिक्षणाधिकारी यांनी त्यांचेस्तरावर पडताळणी करुन ८६३ प्रवेश निश्चित केले आहेत. एकुण २८४५ प्रवेशापैकी फक्त ८६३ प्रवेश झालेले आहेत. म्हणजे १९८२ विद्यावी आजही प्रवेशापासुन वंचीत आहेत. एकुण प्रवेश प्रक्रियेच्या फक्त ३०% प्रवेश झालेले आहेत. ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. तरी सर्व गटशिक्षणाधिकारी व शाळा व्यवस्थापनाने उर्वरीत प्रवेश विहोत वेळेत पुर्ण करुन घेणे गरजेचे आहे.
तरी सर्व निवड यादीतील पालकांना पुन:श्च आवाहन करण्यात येत आहे की, निवड वादीतील प्रवेशाची अंतीम तारीख ३१/०८/२०२० आहे. यानंतर कोणत्याही परिस्थितीत निवड यादीतील विद्याथ्यांना प्रवेश घेता येणार नाही. आणि पात्र विध्या्यांची प्रवेशा संधी जाईल म्हणुन पालकांनी विहोत मुदतीतच आपल्या पाल्यांचे प्रवेश संबंधित शाळेत जाऊन निश्चित करुन घ्यावेत असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार आणि शिक्षणाधिकारी (प्रा) अजय बहिर यांनी केले आहे.