राज्यासह देशभरात आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. कोरोना संकटाच्या सावटाखाली सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून राज्यभरात बाप्पाचं आगमन होत आहे. अनेक घरांमध्ये तर कालपासूनच बाप्पाचं आगमन झालं आहे. तर काही ठिकाणी आज पहाटेपासून बाप्पाचं आगमन होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया! तुमच्यावर गणेशाची कृपा कायम राहो. सर्वत्र आनंद आणि भरभराट असो, असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.