राजधानी दिल्लीत मोठी कारवाई करण्यात आली. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानं शुक्रवारी मध्यरात्री घातपाती कट उधळून लावला. रिंग रोड परिसरातील धोला कुवा येथून पोलिसांनी ISI च्या अतिरेक्याला अटक केली. अटक करण्यापूर्वी पोलीस आणि अतिरेक्यामध्ये चकमक उडाली. मात्र, नंतर पोलिसांनी धडक कारवाई करत अतिरेक्याला बेड्या ठोकल्या. त्याच्याजवळून आयईडी स्फोटकांसह मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्दुल युसूफ असं या दहशतवाद्याचं नाव आहे. दहशतवाद्याकडून मोठ्या प्रमाणात IED स्फोटकांचा साठा जप्त करण्यात आला आहे. दिल्ली पोलिस स्पेशल सेलचे डीसीपी प्रमोदसिंग कुशवाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, धौला कुआंमध्ये दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने केलेल्या कारवाईनंतर ISIS च्या एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. आणखी काही दहशतवाद्यांना अटक करण्यात येऊ शकते
दिल्ली पोलिसांनी दहशतवाद्यांचा मोठा कट उधळून लावला आहे. IED स्फोटकांचा साठा जप्त केला आहे. अब्दुल युसूफ या दहशतवाद्याकडून दोन IED स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत. त्याच्यासोबत आणखी एक साथीदार असल्याची माहिती मिळत आहे. मात्र चकमकीदरम्यान तो फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे