सरकारच्या या निर्णयामुळे 30 ते 35 लाख कामगारांना फायदा मिळणार असून नोकरी गेलेल्यांना दिलासा मिळेल.कोरोना काळात नोकरी गेलेल्यांसाठी बेरोजगार भत्ता म्हणून तीन महिन्यांचा 50 टक्के पगार दिला जाणार आहे. पण ही सुविधा फक्त कर्मचारी राज्य विमा महामंडळाचे सदस्य असणाऱ्या कामगारांनाच मिळणार असल्याची माहिती आहे.
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे औद्योगिक कामगारांना दिलासा मिळणार आहे. कोरोना संकटाचा सर्वाधिक फटका बसणाऱ्या कामगारांना आर्थिक मदत केली जावी अशी मागणी होत होती.
तीन महिन्यांच्या 50 टक्के पगारावर कर्मचारी दावा करु शकतात. आधी ही मर्यादा 25 टक्के होती. याशिवाय अजून एका नियमात बदल करण्यात आला आहे. आधी बेरोजगार झाल्यानंतर 90 दिवसांनंतर याचा फायदा घेतला जाऊ शकत होता. पण आता ही मर्यादा कमी करत 30 दिवसांवर आली आहे.