रूची सोया या पतंजली समुहाच्या कंपनीचा नफा जून तिमाहीमध्ये 13 टक्क्यांनी कमी झाला होता. बुधवारी कंपनीकडून जून तिमाहीच्या निकालांची घोषणा करण्यात आली. यादरम्यान कंपनीच्या नफ्यात 13 टक्क्यांची घट होऊन तो 12.25 कोटी रूपये झाला आहे हे एक कारण असू शकते आचार्य बाळकृष्ण यांच्या राजीनाम्याचे.
आचार्य बाळकृष्ण यांनी त्यांच्या रुची सोया कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. अन्य कामांमध्ये अधिक व्यस्त असल्यानं हा राजीनामा दिल्याचं आचार्य बाळकृष्ण यांनी सांगितलं आहे.
आचार्य बाळकृष्ण यांनी व्यस्त असल्यामुळे तात्काळ प्रभावानं रुची सोया या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. संचालक मंडळानं त्यांचा राजीनामा स्वीकारला असून त्यांना पदावरून कार्यमुक्त केलं आहे, अशी माहिती कंपनीनं दिलीये.