मुकेश अंबानींची घटली संपत्ती; हे आहे कारण

मुंबई: मुकेश अंबानी यांच्या संपत्तीमध्ये घट होऊन ते आता डायरेक्ट सहाव्या स्थानावर गेले आहेत. मुकेश अंबानी यांच्या कंपनीत होणाऱ्या इन्व्हेस्टमेंट वरून पाहता त्यांच्या संपत्तीमध्ये वाढ होणे आवश्यक होते पण घट झालेली आहे मुकेश अंबानी यांच्या कंपनीमध्ये फेसबुक’ने 5.7 बिलीयन इन्व्हेस्टमेंट केलेली आहे.

ब्लूमबर्ग बिलिनियर इंडेक्सनुसार मुकेश अंबानींची एकूण संपत्ती ७८.८ अब्ज डॉलर इतकी आहे. श्रीमंत व्यक्तींच्या यादीत त्यांचा जगात सहावा क्रमांक लागतो. या यादीत ऍमेझॉनचे प्रमुख जेफ बेजोस पहिल्या स्थानी आहेत. त्यांची संपत्ती १८८ अब्ज डॉलर आहे. यंदाच्या वर्षात बेजोस यांच्या संपत्तीत ७३ अब्ज डॉलरची घसघशीत वाढ झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुकेश अंबानींच्या रिलायन्सचे शेअर घसरत आहेत. त्यामुळे मुकेश अंबानींच्या संपत्तीचं मूल्यदेखील घसरलं आहे. सध्याच्या घडीला त्यांच्या संपत्तीचं मूल्य ७८.८ अब्ज डॉलर इतकं आहे. अंबानींच्या संपत्तीचं मूल्य कमी होत असताना टेस्ला आणि स्पेस एक्सचे सीईओ एलन मस्क यांच्या संपत्तीत वाढ झाली.

मस्क यांची एकूण संपत्ती ८४.४ अब्ज डॉलर इतकी आहे. एकाच दिवसात मस्क यांच्या संपत्तीत ८ अब्ज डॉलर्सनं वाढ झाली. काल अमेरिकन शेअर बाजारात टेस्लाचे शेअर ११ टक्क्यांनी वधारले. त्यामुळे मस्क यांची संपत्ती ८ अब्ज डॉलर्सनं वाढली. जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मस्क यांच्यानंतर बनार्ड ऑर्नोल्ट यांचा क्रमांक लागतो. त्यांची संपत्ती ८४.६ अब्ज डॉलर इतकी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!