मुंबई | भाजप नेते निलेश राणे यांना कोरोनाची लागण झाली आहे. स्वत: ट्विट करत त्यांनी कोरोना पॉझिटिव्ह आल्याचं सांगितलं आहे.
कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसल्याने चाचणी केली असता माझा कोविड-19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याचं निलेश राणे यांनी सांगितलं आहे. तसंच स्वतःला सेल्फ क्वारंटाईन करून घेतले असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. (BJP Leader Nilesh Rane Tested Corona Positive)
सध्या माझी तब्येत उत्तम असून गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी स्वत:ची चाचणी करावी, असं महत्त्वाचं आवाहन निलेश राणे यांनी केलं आहे.
कोरोना काळात लॉकडाऊन, कोरोना उपाययोजना, शासन-प्रशासनाचा संवाद अभाव यावरून नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठवली होती. ठाकरे सरकारवरील टीकेची एकही संधी निलेश राणे यांनी सोडली नव्हती.