काल धोनीने आपली निवृत्ती घोषित केली. धोनीचे क्रिकेट करिअर सर्वांच माहित आहे. पण धोनीचे प्रेम फार कमी लोकांना माहित आहेत. क्रिकेटच्या मैदानात आपल्या नेतृत्वाची छाप सोडणाऱ्या महेंद्र सिंह धोनी पदार्पणाच्या काळात बॉलिवूड अभिनेत्रींसोबतच्या प्रेम प्रकरणामुळेही चर्चेत राहिला होता. साक्षीसोबत विवाहबद्ध होण्यापूर्वी धोनीच्या आयुष्यात अनेकजणींची नावे जोडली गेली. त्याची जोरदार चर्चाही रंगली. धोनीच्या पहिल्या गर्लफ्रेंडचे नाव प्रियांका झा असे होते. वयाच्या 20 व्या वर्षी भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी धोनीचा संघर्ष सुरु होता त्यावेळी धोनी आणि प्रियांका यांच्यातील प्रेम प्रकरण फुलले. एका कार अपघातामध्ये प्रियांकाचा मृत्यू झाला. ही घटना घडली त्यावेळी धोनी परदेश दौऱ्यावर होता. त्यानंतर साक्षीसोबत विवाहबद्ध होण्यापूर्वी धोनीसोबत काही बॉलिवूडमधील अभिनेत्रींची नावे जोडली गेली.
दीपिका पादुकोण-
सध्याच्या घडीला बॉलिवूडमधून हॉलिवूडमध्ये पोहचलेली आघाडीची अभिनेत्री दिपिका पादुकोण आणि धोनी यांच्यात प्रेम प्रकरण सुरु असल्याची चर्चा रंगली होती. 2007 मध्ये माहीने दिपिका पादुकोण आवडते असे म्हटले होते. ‘ओम शांती ओम’ या चित्रपटाच्या स्क्रिनिंगवेळी शाहरुखशी बोलताना धोनीने मनातील भावना बोलून दाखवली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एका टी-20 सामन्याला दिपिकाने हजेरी लावली होती. धोनीने आपली लांब केसांची हेअर स्टाइल दिपिकामुळे बदलल्याचेही बोलले गेले. दिपिकाला पुरुषांना असणारी लांब केस आवडत नव्हते. त्यामुळेच धोनीने आपली हेअर स्टाइल बदलली, अशी चर्चा त्यावेळी रंगली. पण धोनीने ही गोष्ट कधीच मान्य केली नाही.
प्रीति सिमोस-
प्रीति सिमोस हिच्यासोबतही धोनीच नाव जोडलं गेले. कपिल शर्माच्या ‘कॉमेडी नाइट विथ कपिल’ कार्यक्रमाची क्रिएटिव्ह डायरेक्ट प्रीती सिमोस सोबत धोनी काही काळ रिलेशनमध्ये होता असे बोलले गेले.
राय लक्ष्मी-
2009 मध्ये दाक्षिणात्य अभिनेत्री राय लक्ष्मी- माही(Raai Laxmi and mahi) यांच्यात काही काळ डेटिंग सुरु होते. याचीही चांगलीच चर्चा रंगली. पण काही महिने चाललेल्या डेटिंगसंदर्भात दोघांनी कधीच सार्वजनिक भाष्य केले नाही. रायने तर धोनीसोबत कोणतेही संबंध नाहीत, असे सांगत चर्चेला पूर्णविराम दिला होता.
आसीन (Asain and dhoni)-

धोनी आणि आसीन यांच्यात प्रेम प्रकरण सुरु असल्याची चर्चा देखील रंगली होती. ही दोघांनी एका फॅशन ब्रँडसाठी एकत्रित काम केले होते. तेव्हापासूनच धोनी-आसीन यांच्यात काही तरी शिजत असल्याची चर्चा सुरु झाली. 2010 मध्ये आयपीएलच्या सेमीफायनपूर्वी आसीनच्या लोखंडवाला अपार्टमेंटच्या बाहेर धोनीला पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले होते. या सर्व चर्चेला पूर्णविराम देत धोनीने साक्षीसोबत विवाह थाटला होता. ही जोडी चांगलीच लोकप्रिय आहे.