मुंबई : नवाब मलिक साहेब फक्त अल्पसंख्याक तरुणांना पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण तुम्ही देणार आहात. मग गोरगरिबांच्या पोरांनी काय पाप केले आहे? उन पावसाची तमा न करता हि पोरं पोलीस भरतीची तयारी करत असतात. पायात घालायला बुट नसतात तरी पळत असतात कारण की घरांमधली गरिबी हटवायचे असते देशासाठी काहीतरी करण्याची धडपड त्यांच्या मनामध्ये असते. अल्पसंख्याक नसले म्हणून काय झालं यांच्यामध्ये सुद्धा देशासाठी आणि समाजासाठी काहीतरी करण्याची धडपड आहे. तुम्ही जर म्हणाले असते की गोरगरीब तरूणांना पोलीस भरतीचे पूर्व प्रशिक्षण मोफत देणार आम्हाला तुमचा सार्थ अभिमान वाटला असता असा सवाल सर्व सामान्य तरुणांना मधून होत आहे.
काय आहे नवाब मलिक यांची घोषणा
पोलीस पदावर अधिकाधिक अल्पसंख्याक तरुणांची निवड होण्याच्या दृष्टीने त्यांना पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली. सध्या या प्रशिक्षणासाठी राज्यातील 14 जिल्ह्यांमधून इच्छुक प्रशिक्षणार्थी उमेदवारांची निवड प्रक्रिया सुरु करण्यात आली असून उर्वरित जिल्ह्यांमध्येही ती लवकरच सुरु केली जाईल, असंही त्यांनी सांगितलं आहे.