मुंबई | भारत कोरोनाविरोधात ‘भाभीजी पापड’ लाटत बसला आणि तिकडे रशियाने कोरोनावर ‘लस’ बनवून बाजारात आणली. जागतिक आरोग्य संघटनेलाही त्याबाबत विचारले नाही. याला म्हणतात महासत्ता. आम्ही आमच्या मस्तीत आहोत, असा टोला खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकारला लगावला आहे.राष्ट्रातील संकटकाळात आम्हीच आमचे निर्णय घेऊ, जगाने नाक खुपसू नये असे बेदरकारपणे वागणाऱ्या रशियाचा आदर्श आमचे राजकारणी ठेवणार नाहीत. आजही ते अमेरिकेच्या प्रेमात पागल झाले आहेत, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
हीच लस अमेरिकेत सर्वप्रथम बनली असती तर ट्रम्प यांचं काय कौतुक आपण केलं असतं. आज ज्या मंत्र्यांना व बड्या अधिकाऱ्यांना कोरोना झाला आहे, त्यांनी रशियाची लस गुप्त मार्गाने आधीच आणली असेल, पण देशातील लाखो गोरगरीबांना वाली कोण? हा प्रश्न अनुत्तरित आहे, असा सवाल संजय राऊतांनी केंद्र सरकारला केला आहे.
रशियाने बनवलेली लस बेकायदेशीर ठरवण्याचे प्रयत्न जागतिक पातळीवर सुरू झाले आहेत, पण रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी ही लस सर्वप्रथम आपल्या तरुण मुलींनाच टोचली व आपल्या देशात आत्मविश्वास निर्माण केला. आत्मनिर्भरतेचा हा पहिला धडा रशियाने घालून दिला. आपण आत्मनिर्भरतेवर प्रवचनेच झोडत बसलो आहोत, असा चिमटा राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी काढला आहे.
मोदी सरकारचे खूप-खूप धन्यवाद-अभिनेता अक्षय कुमार
राम मंदिराचे भूमिपूजन : फटाके फोडणाऱ्या भाजपाच्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल !