Beed: Coron 83 people positive
बीड जिल्ह्यात शनिवारी (दि.15) आणखी 83 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण निष्पन्न झाले आहेत. त्यामुळे आता एकुण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2500 इतकी झाली आहे. शनिवारी जिल्ह्यातून तपासणीसाठी पाठवलेले 450 अहवाल रात्री प्राप्त झाले. पैकी 83 कोरोना पॉझिटिव्ह, 10 अनिर्णयीत तर 357 रिपोर्ट निगेटिव्ह आले.
बाधित रुग्णांमध्ये अंबाजोगाईतील 12, आष्टी-14, बीड-20, धारुर-7, गेवराई-1, केज-6, माजलगाव-9, परळी-7 पाटोदा-2, शिरुर-2 आणि वडवणी तालुक्यातील 3 रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत 965 जणांनी कोरोनावर मात केली आहे तर 62 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शनिवारी दिवसभरात काही रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे.
बाधित रुग्ण पुढीलप्रमाणे


