मुंबई: सहकार आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.बाळासाहेब पाटील यांना कोरोनाची काही लक्षणे दिसून येत होती. त्यामुळे त्यांनी स्वत:हून अँटीजेन टेस्टसह आरटीपीसीआर चाचणी केली होती. हा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला.
दरम्यान, अशोक चव्हाण, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, अस्लम शेख यांना याआधी कोरोनाची लागण झाली होती. हे सर्व मंत्री कोरोनामुक्त झाले आहेत.