नवी दिल्ली | दिल्लीतील लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. त्यानंतर नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाच्या कार्यकाळातील सलग सातव्यांदा ऐतिहासिक भाषण करत आहेत. अटलजींनी लाल किल्ल्यावरून सहा वेळा केलेल्या भाषणाचा रेकाॅर्ड मोदीजींच्या आजच्या भाषणानं मोडला आहे.
हे वाचा- दहावी, बारावी उत्तीर्ण न होऊ शकलेल्या विद्यार्थ्यांबाबत राज्य शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय.
नरेंद्र मोदी २०१४ पासून पंतप्रधान पदावर कायम आहेत. सलग दोन टर्म निवडून आल्याने लाल किल्ल्यावरुन भाषण देण्याचा बहुमानही त्यांना मिळाला आहे. आज पार पडत असलेल्या स्वातंत्र्यदिनी मोदीजींनी आज सातव्यांदा संबोधन केलं आहे. अटलबिहारी वाजपेयींनी याआधी सहा वेळा लाल किल्ल्यावरुन संबोधन केलं होतं.