राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कोणताही वाद नाही, पक्ष एकसंघ आहे. राज्यातील अनेक नेते आणि प्रमुख कार्यकर्त्यांना पक्षात परत यायचं आहे. जे भाजपत गेलेत ते संपर्क करत आहेत, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितलं आहे.
भाजपत गेल्यानंतर ज्यांचा निवडणुकीत पराभव झाला ते आमच्याशी संपर्क करत आहेत. त्यांच्याशी आमची चर्चा सुरु आहे. त्यांना पक्षात घेण्यात अडचण नाही, असं जयंत पाटील म्हणालेत.