गणपती विसर्जनानंतर महाविकासआघाडीचंही विसर्जन-रामदास आठवले

महाविकासआघाडीच्या भवितव्याशीच या घडामोडी जोडत आठवले यांनी एक लक्षवेधी भाकीत केलं आहे. पार्थ पवारांबाबत शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अजित पवार नाराज होतील. पुढं तिन्ही पक्षांच्या अंतर्गत वाद आणि बंडाळींमुळं याचे थेट परिणाम हे महाविकासआघाडी सरकारवर होतील असं आठवले यांनी स्पष्ट  केलं. 

हे वाचा – MPSC: 20 सप्टेंबर, 2020 रोजी होणारी विविध पदांसाठीची भरती परीक्षा, आता फक्त मुंबई आणि पुणे येथे न होता, राज्यातील सर्व विभागीय केंद्रांवर

इतकंच नव्हे तर सध्याच्या सर्व घडामोडी पाहता महाविकासआघाडी सरकारच्या भवितव्याचं काही खरं नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. शिवाय मयायुतीच्या बाजूनं कौल देत यंदाच्या वर्षी श्रीगणेश विसर्जनानंतर महाविकासआघाडी सरकारचंही विसर्जन होईल आणि पुन्हा महायुतीचं सरकार येईल, असं भाकीत त्यांनी केलं. 

हे वाचा CET होणार की नाही? काय म्हणाले उच्च शिक्षणमंत्री?

आठवलेंनी केलेलं हे भाकीत पाहता आता पुढं काय? हाच प्रश्न उपस्थित होत आहे. त्यातच पार्थ पवार आता मोठा निर्णय घेणार असल्याचंही वृत्त हाती आलं आहे. त्यामुळं आता पार्थ पवार यांच्या निर्णयाकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं असेल. दरम्यान, शरद पवार यांच्या वक्तव्यावर अजित पवार आणि पार्थ पवार तसंच राष्ट्रवादीकडूनही अजून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!