नवी दिल्ली | अहमदनगर जिल्ह्यातील नगर आणि राहता तालुक्यातील शेतकऱ्यांना 2017-18 आणि 2018-19 ह्या दोन आर्थिक वर्षात पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत पिक विमा विम्याची रक्कम खात्यात जमा झाली नसल्याने संबंधित विमा कंपनी आवश्यक त्या सूचना करण्याचे विनंती खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आणि माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी केंद्रीय कृषिमंत्री तथा ग्राम विकास मंत्री श्री नरेंद्र सिंग तोमर यांना आज दिल्ली येथे भेटून केली. (MP Sujay Vikhe patil And Shivajirao kardile Meet Narendra Sinh Tomar)
अहमदनगर जिल्हा सहकारी बँक च्या वतीने आज बँकेचे संचालक व माजी आमदार श्री शिवाजी कर्डीले व खासदार डॉ सुजय विखे यांनी ह्याबाबत मंत्री महोदयांचे लक्ष वेधले. पंतप्रधान फसल बीमा योजनेअंतर्गत यापूर्वी केंद्रीय स्तरावर केलेल्या पाठपुराव्यामुळे नगर जिल्ह्यातील 1, 69, 027 शेतकऱ्यांना 144 कोटी रुपयाचा पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्याबद्दल खासदार डॉक्टर सुजय विखे शेतकर्यांच्या वतीने केंद्र सरकारचे आभार मानले. (MP Sujay Vikhe patil And Shivajirao kardile Meet Narendra Sinh Tomar)
नगर आणि राहता तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप 2017 -18 आणि 2018-19 ची विमा रक्कम काही तांत्रिक कारणामुळे जमा झाली नसल्याने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी संबंधित विमा कंपनी स सूचना देण्याची विनंती मंत्री महोदय यांना केली. (MP Sujay Vikhe patil And Shivajirao kardile Meet Narendra Sinh Tomar)
खासदार विखे व माजी आमदार कर्डिले यांच्या कडुन केंद्रीय कृषिमंत्र्यांनी सहकारी बँकेच्या मार्फत पंतप्रधान पिक विमा योजना संदर्भातली माहिती सुद्धा यावेळी जाणून घेतली. (MP Sujay Vikhe patil And Shivajirao kardile Meet Narendra Sinh Tomar)