‘नया है वह’-छगन भुजबळ

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करणाऱ्या पार्थ पवार यांना शरद पवार यांनी फटकारलं होतं. “पार्थ पवार यांचं वक्तव्य इमॅच्युर असून त्यांच्या बोलण्याला कवडीची किंमत आम्ही देत नाही “, असं शरद पवार म्हणाले होते.

याविषयी आज (13 ऑगस्ट) छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर छगन भुजबळ म्हणाले की, पवार साहेबांनी सांगितलं त्यावर पुन्हा मी काही बोलण्याची गरज नाही. हिंदीत सांगायचं झालं तर ‘नया है वह’.

तसंच पवार कुटुंबात वाद नसल्याचंही छगन भुजबळ यांनी सांगितलं. ते म्हणाले की, “पवार कुटुंब सगळं एकत्रित आहे, चांगलं आहे. आम्ही सुद्धा त्याच कुटुंबातील सभासद आहोत. अजितदादा पण दुखावलेले नाहीत. कोणी दुखावलेले नाहीत, सगळे एकत्रित आहोत. कुटुंबात एकमेकांना सुचवू शकतात.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!