राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी मोठं वक्तव्य केलं

नवी दिल्ली | मोदी सरकारने काही दिवसांपूर्वी चीनला मोठा दणका दिला. लोकप्रिय अ‍ॅप टिकटॉकसह 59 चिनी अ‍ॅप्सवर मोदी सरकारने बंदी घातली आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याचं सांगत बंदी घालण्यात आली आहे. यासंदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

स्वदेशीचा अर्थ विदेशी वस्तूंवर सरसकट बहिष्कार टाकणं नाही, असं मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. एका पुस्तकांच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते.

स्वदेशी वस्तूंचा वापर याचा अर्थ असा नाही की विदेशी वस्तूंवर सरसकट बंदी घालावी. जगभरात ज्या गोष्टी चांगल्या आहेत आणि ज्याची देशात कमतरता आहे अशा गोष्टी आयात करता येऊ शकतात, असं भागवत यांनी म्हटलं आहे.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या लोकांचे ज्ञान आणि क्षमता याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. अनुभवावर आधारित ज्ञानाला पुढे आणण्याची आवश्यकता आहे. विदेशी वस्तूंवर केवळ अवलंबून राहू नये. जर तसं करायचं असेल तर प्रत्येकाने आपल्या अटी आणि शर्तींवर ही गोष्ट करायला हवी, असंही मोहन भागवत म्हणाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!