बीड : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कंटेनमेंट झोन तयार करण्यात येतात असेच कंटेनमेंट झोन बीड जिल्ह्यात सुद्धा करण्यात आलेले आहेत. ज्या कंटेनमेंट झोनमध्ये चौदा ते पंधरा दिवसांमध्ये एकही कोरोना पेशंट आढळून आला नाही अशा ठिकाणचे कंटेनमेंट झोन काढून टाकण्यात येतात. बीडमध्ये सुद्धा खालील ठिकाणचे कंटेनमेंट वरून काढून टाकण्यात आलेले आहेत. तीन तालुक्यातील काही प्रतिबंधात्मक कार्यक्षेत्रामध्ये गेल्या १४ दिवसात एकही कोविंड १९ आढळून आला नसल्याने बीड तालुक्यातील रुबा गल्ली चौसाळा, आष्टी तालुक्यातील लोणी सय्यद मीर, पाटोदा तालुक्यातील महेंद्रवाडी या गावामध्ये प्रतिबंध शिथील करण्यात आले असल्याचे आदेश जिल्हा अप्पर जिल्हादंडाधिकारी प्रवीण कुमार धरमकर यांनी दिले आहेत. या गावांमध्ये १४ दिवसात एकही कोविंड १९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही, असे जिल्हा आरोग्य अधिकारी बीड यांनी कळविले आहे.
बीड तालुक्यातील रुबा गल्ली चौसाळा, आष्टी तालुक्यातील लोणी सय्यद मीर, पाटोदा तालुक्यातील महेंद्र वाडी येथे प्रतिबंधात्मक कार्यक्षेत्रामध्ये वरील तालुक्यातील संबंधित गावे असलेला कंटेनमेंट झोन शिथिल करण्यात आला आहे. या ठिकाणी परिस्थिती पूर्ववत करण्यात आली आहे, असे आदेश दिले आहेत.