बीडमध्ये ‘डफली बजाव’ आंदोलन

बीड,दि.11 : वाढत चालेल्या कोरोनाबाधित रुग्णामुळे जिल्हाधिकारी यांनी दहा दिवसाचाचे लॉकडाऊन जाहिर केले असून जाहिर केलेल्या लॉकडाऊनच्या निषेर्धाथ वंचित बहुजन आघाडीच्या कार्याकर्त्यांकडून बीड बस स्थानक येथे डफली आंदोलन करण्यात आले.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी या आधीच लॉक डाउन विरोध केला होता आणि हा विरोध दर्शवण्यासाठी डफडी बजाव आंदोलन करण्यात येणार होते त्याचीच अंमलबजावणी बीडमध्ये आज 12 ऑगस्ट 2020 रोजी करण्यात आले

संचार बंदीचे उल्लंघन करून आंदोलन केल्या प्रकरणी संतोष जोगदंड, अजय सरवदे, ज्ञानेश्‍वर कवठेकर, किरण वाघमारे, अजय साबळे, शेख युनुस, संदिप जाधव, उमेश तुळे, विश्वजीत डोंगरे, सुमीत उजगरे, राजू कवठेकर, आकाश साबळे, अक्षय वाघमारे यांच्यासह 5 ते 6 जणांविरूद्ध बीड शिवाजी नगर पोलीस ठाण्यात कलम 188, 269, 270 आयपीसी तसेच अपत्तीव्यवस्थान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा  –   UPSC IES परीक्षेसाठी अर्ज भरण्यास सुरूवात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!