सुशांत सिंह प्रकरणावरुन महाराष्ट्र सरकार अजिबात अस्थिर नाही. अशा प्रकरणांमुळे सरकार अस्थिर होऊ लागली तर आधी केंद्रातील सरकार पडेल असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. सुशांत सिंह प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबई पोलीसच सक्षम आहेत. त्यांनीच हा तपास पुढे नेला पाहिजे आणि तेच नेतील. अशाप्रकारे मुंबई पोलिसांना अस्वस्थ करुन त्यांच्यावर दबाव आणला जाऊ नये असंही संजय राऊत यांनी सांगितलं आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
सुशांत सिंह प्रकरणावरुन राजकारण करण्याची ही वेळ नाही. राजकारण न करता देश पुढे जावा ही आमची स्पष्ट भूमिका आहे. सुशांत सिंहला न्याय मिळो अशी माझी प्रार्थना असल्याचं, संजय राऊत यांनी सांगितलं आहे. महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचं हे षडयंत्र आहे असा पुन्हा एकदा त्यांनी आरोप
“महाराष्ट्रापुढे अनेक प्रश्न आहेत. ते सोडवण्यासाठी मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, शरद पवार तसंच सगळे मंत्री प्रयत्न कत आहेत. त्यातही कोणाला सरकार पाडणं, अस्थिर करणं यात रस असेल तर त्यांनी जनतेच्या दु:खावर पोळ्या शेकण्याचं काम करत राहावं. हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे. येथे जनतेचं हित याला सगळ्यात मोठं प्राधान्य द्यावं लागतं. प्रधानमंत्र्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनीही महाराष्ट्राच्या हितावरच बोट ठेवलं होतं,” असं संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं.
हे वाचा- विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, राज्यातील सीइटी रद्द होणार नाही………