दिग्दर्शक निशिकांत कामत यांची प्रकृती चिंताजनक

हैदराबाद : ‘डोंबिवली फास्ट’ या मराठी चित्रपटापासून सिनेकारकिर्दीची सुरुवात करणारे दिग्दर्शक निशिकांत कामत यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. निशिकांत कामत लिव्हर सिरोसिस नावाच्या आजाराने ग्रस्त आहेत. या आजारामुळे गेल्या 10 दिवसांपासून निशिकांत यांना हैदराबादमधील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. प्रकृती अत्यंत नाजूक असल्याचे ते सध्या तो आयसीयूमध्ये दाखल आहेत.

दृष्यम, मदारी, मुंबई मेरी जान यासारख्या अनेक हिंदी चित्रपटातून निशीकांत कामतने आपला ठसा बॉलिवूडमध्ये उमटवला आहे. त्याआधी डोंबिवली फास्ट या चित्रपटाचं दिग्दर्शन केल्यानंतर निशीकांत कामत हे नाव सर्व महाराष्ट्राला परिचीत झालं. डोंबिवली फास्ट चित्रपटाला अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. याव्यतिरीक्त जॉन अब्राहमच्या रॉकी हँडसम चित्रपटात निशीकांत कामतने खलनायकाची भूमिका केली आहे. २०२२ साली निशीकांतचा दरबदर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणं अपेक्षित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!