सांगली | केंद्राने दूध भुकटी आयात केली नसताना बाळासाहेब थोरात आयात केली असं सांगत आहेत. असं सांगून ते शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे.
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या म्हणण्याप्रमाणे जर केंद्राने दूध भुकटी आयात केली असेल, तर त्याचा पुरावा द्यावा, असं आव्हान देखील सदाभाऊ खोत यांनी बाळासाहेब थोरात यांना दिलं आहे.
दूध दरवाढीवर राज्य सरकारने कोणताही सकारात्मक निर्णय घेतलेला नाहीये. त्यामुळे 13 ऑगस्टपासून 18 ऑगस्टपर्यंत आंदोलन करण्यात येणार आहे. या दरम्यान 5 लाख पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे पाठवण्यात येणार आहे, असं सदाभाऊ खोत यांनी आज सांगितलं आहे.
दुसरीकडे गायीच्या दूधाला 10 रुपये अनुदान आणि दूध भुकटीला 50 रुपये अनुदान द्यावे, अशी मागणीही सदाभाऊ खोत यांनी केली आहे