नवी दिल्ली, 01 सप्टेंबर : ऑगस्ट महिन्यानंतर सप्टेंबर महिन्यात देखील एलपीजी घरगुती गॅस सिलेंडर च्या किंमतीत सामान्यांना दिलासा मिळाला आहे. तेल कंपन्यांनी एलपीजी घरगुती गॅसच्या किंमतीत कोणतेही बदल केले नाही आहेत. मुंबईमध्ये 14.2 किलोग्रॅम सबसिडी नसणाऱ्या घरगुती गॅसची किंमत 594 रुपयांवर स्थीर आहे. जून आणि जुलै महिन्यात घरगुती गॅसच्या किंमती वाढल्या होत्या. परंतू ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात किंमती स्थीर ठेवण्यात आल्या आहेत. मुंबईसह अन्य शहरांमध्ये देखील किंमती स्थीर ठेवण्यात आल्या आहेत, काही शहरात किंमती कमी झाल्या आहेत. IOC च्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार या किंमती आहेत. दिल्लीमध्ये तर 19 किलोग्रॅम घरगुती गॅसची किंमत 2 रुपयांपर्यंत स्वस्त झाली आहे.
हे पण वाचा : आंबेडकरांच्या हिंदुत्वाच्या दिशेने येणाऱ्या दिंडीयात्रेचे स्वागतच: शिवसेना
काय आहेत नवे दर
देशातील सर्वात मोठी तेल मार्केटिंग कंपनी आयओसी (IOC) च्या वेबसाइटवर देण्यात आलेल्या किंमतीनुसार दिल्लीमध्ये सिलेंडरच्या किंमती स्थीर आहेत. गेल्या महिन्यात ऑगस्टमध्ये जे भाव होते तेच याही महिन्यात आहेत.
दिल्लीमध्ये 14.2 किलोग्रॅम सबसिडी नसणाऱ्या घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 594 रुपयांवर स्थीर आहे. मुंबईमध्ये या घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 594 रुपये आहे. चेन्नईमध्ये ही किंमत 50 पैशांनी कमी होऊन प्रति सिलेंडर 610 रुपये झाली आहे. कोलकातामध्ये 14.2 किलो घरगुती गॅसच्या किंमती 50 पैसे प्रति सिलेंडर वाढल्या आहेत.