या कर च्या जबरदस्त विक्रीमुळे मारुतीच्या कार विक्रीत 17% वाढ

मारुती सुझुकी (Maruti Suzuki)ची कार विक्री आता अनलॉक कालावधी दरम्यान पुन्हा एकदा रुळावर येताना दिसत आहे. कंपनीच्या मिनी कार ‘अल्टो’ (alto) आणि ‘वॅगन आर’ (Wagnor) च्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे.
ऑगस्टमध्ये विक्री 17.1 टक्क्यांनी वाढली
कंपनीने(17% increase in Maruti car sales)दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्टमध्ये वाहनांची विक्री 17.1 टक्क्यांनी वाढून 1,24,624 वाहनांवर पोहोचली आहे. वर्षभरापूर्वी याच महिन्यात कंपनीने 1,06,413 वाहनांची विक्री केली होती. ऑगस्टमध्ये स्थानिक बाजारात मारुतीच्या कारची विक्री 20.2 टक्क्यांनी वाढून 1,16,704 वाहनांवर गेली आहे. जी ऑगस्ट 2019 मध्ये ते 97,061 युनिट्स इतकी होती.

हे वाचा : Gay App वापरणे विवाहित तरुणाला महागात पडले

‘अल्टो’च्या मागणीत प्रचंड वाढ
ऑगस्ट (17% increase in Maruti car sales)महिन्यात मारुतीच्या मिनी कार अल्टो आणि वॅगन आरची विक्री 94.7 टक्क्यांनी वाढून 19,709 वाहनांवर पोहोचली. जी ऑगस्ट 2019 मध्ये ते 10,123 युनिट्स इतकी होती. त्याचप्रमाणे कॉम्पॅक्ट प्रकारात स्विफ्ट, Celerio , Ignis, Baleno आणि dzire यांची विक्री 14.2 टक्क्यांनी वाढून 61,956 वाहनांवर गेली. जी ऑगस्ट 2019 मध्ये 54,274 युनिट्स इतकी होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!