कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका; दिल्लीच्या रुग्णालयात उपचार सुरू

नवी दिल्ली – कपिल देव यांच्या तब्येतीबद्दल बातमी येताच सोशल मीडियावर चाहत्यांनी त्यांच्यासाठी प्रार्थना सुरु केली आहे. भारताला पहिला एकदिवसीय विश्वचषक देणारा कपिल देव याची गणना जगातील महान अष्टपैलू खेळाडूंमध्ये केली जाते. माजी कर्णधार आणि क्रिकेट विश्वातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंच्या नेतृत्वात भारताने पहिल्यांदाच १९८३ मध्ये विश्वकप जिंकला होता.

हे वाचा : दारू पिऊन कुख्यात गुंडाचा तरुणीसोबत धिंगाणा, व्हिडीओ व्हायरल होताच केली अटक

ज्येष्ठ भारतीय क्रिकेटपटू कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी आहे. दिल्लीतील रुग्णालयात सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. कपिल देव यांची अँजिओप्लास्टी झाली होती. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितले जात आहे.

कपिल देव यांनी आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत १३१ कसोटी आणि २२५ एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर ५२४८ धावा आणि ४३४ बळींची नोंद आहे. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत कपिल यांनी ३७८३ धावा केल्या तसेच २५३ बळी घेतले. १९९४ मध्ये फरीदाबाद येथे वेस्ट इंडीज विरूद्ध त्यांनी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.

error: Content is protected !!