नवी दिल्ली : बॉलिवूडची प्रतिमा खराब करण्याचा आरोप समाजवादी पक्षाच्या राज्यसभा खासदार जया बच्चन यांनी केलाय. बॉलिवूडवर केल्या जाणाऱ्या आरोपांदरम्यान मंगळवारी शून्यकाळात जया बच्चन यांनी सरकारकडे हिंदी सिनेसृष्टीच्या मागे उभं राहण्याची विनंती केली. ‘जिस थाली में खाते हैं, उसी में छेद करते हैं‘ असं म्हणत भाजप खासदार रवि किशन यांचं नाव न घेता बच्चन यांनी त्यांच्यावर निशाणा साधलाय.