नवी दिल्ली, 7 सप्टेंबर : भारताचे तसेच सर्व जगाचे लक्ष असलेल्या आयपीएल (IPL) च्या 13व्या सीजनची सुरुवात 19 सप्टेंबरपासून होणार आहे. बीसीसीआयने (BCCI) रविवारी त्याचं वेळापत्रक जारी केलं आहे. टूर्नामेंटची पहिली मॅच गेल्या वर्षी फायनल खेळणाऱ्या दोन टीम मुंबई इंडियन्स मुंबई (Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) यांच्यामध्ये खेळली जाईल. 8 टीममध्ये सहभागी दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) ची टीम आतापर्यंत एकदाही हा खिताब जिंकू शकलेली नाही. दिल्ली कॅपिटल्सची टीम टूर्नामेंटची आपली पहिली मॅच किंग्स इलेव्हन पंजाबच्या विरोधात 20 सप्टेंबर रोजी दुबईमध्ये खेळणार आहे, त्याच टूर्नामेंटचा त्यांचा शेवटचा खेळ विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोरसोबत आहे.
हे वाचा : मुलाला वाचवण्यासाठी आईने केले जीवाचे रान
हे आहे संपूर्ण शेड्यूल
20 सप्टेंबर : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब, दुबई
25 सप्टेंबर : चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, दुबई
29 सप्टेंबर : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइजर्स हैद्राबाद, अबु धाबी
03 ऑक्टोबर : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कलकत्ता नाइट रायडर्स, शारजाह
05 ऑक्टोबर : रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, दुबई
09 ऑक्टोबर : राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, शारजाह
11 ऑक्टोबर : मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, अबु धाबी
14 ऑक्टोबर : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, दुबई
17 ऑक्टोबर : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, शारजाह
20 ऑक्टोबर : किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, दुबई
24 ऑक्टोबर : कलकत्ता नाइट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, अबु धाबी
27 ऑक्टोबर : सनरायजर्स हैद्राबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, दुबई
31 ऑक्टोबर : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, दुबई
02 नोव्हेबंर : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर, अबु धाबी