बीड – अल्पवयीन मुलीस पळवून बलात्कार केल्याच्या आरोपातून अक्षय शिवराम खरात यांची निर्दोष मुक्तता झाली आहे. आरोपीच्या वतीने अॅड.कणाद उगलमुगले यांनी यशस्वीपणे बाजू मांडली.
यासंदर्भात माहिती अशी की, अल्पवयीन मुलीस लग्नाचे अमिष दाखवून जबरदस्तीने अत्याचार केल्याप्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात दि.27 एप्रिल 2019 रोजी कलम 363, 366 (अ), 376 व बाल लैंगिक अत्याचार कायद्यान्वये 124/2019 अन्वये गुन्हा दाखल झाला होता. तपास अधिकारी यांनी फिर्यादीच्या मुलीचे वय 17 वर्षे असल्याचे निदर्शनास आल्यामुळे बाल लैंगिक अत्याचार कायद्याचे कलमे वाढविण्यात आली. पोलीसांनी तपास करून दोेषारोपपत्र विशेष न्यायालयात दाखल केले.
सदर प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने तपासण्यात आलेल्या साक्षीदाराची साक्ष आरोपीविरुध्द गुन्हा सिध्द करून शकली नाही. व आरोपीचे वकील अॅड कनाद तात्याराम उगलमुगले यांनी घेतलेला बचावामुळे सबळ पुराव्याअभावी आरोपीची निर्दोष मुक्तता झाली. विशेेष सत्र न्यायाधिश, बीड यांनी आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे.