आत्महत्येस प्रवृत्त केले; नवरा व सासुला २ वर्षे कारावास

बीड दि.14 (प्रतिनिधी): चारित्र्याचा संशय आणि हुंड्यासाठी होत असलेल्या शारिरीक आणि मानसिक छळाला कंटालेल्या महिलेस आत्महत्तेस प्रवृत्त केल्याप्रकरणी शकुतंला नारायण सिरसट व हनुमान नारायण सिरसट रा. माजलगाव या दोघांना दोन वर्षाची सश्रम करावासाची शिक्षा झाली. जिल्हा व सत्र न्यायाधिश अरविंंद एस. वाघमारे यांनी दि. 14 डिसेंबर 2020 रोजी दोघा आरोपींना शिक्षा ठोठावली. सरकार पक्षाच्या वतीने जिल्हा सहाय्यक सरकारी वकील अजय तांदळे आणि अ‍ॅड. रणजित वाघमारे यांनी काम पाहिले.

हे वाचा : राज ठाकरेंनी दिले ‘हे’ आदेश; मनसे उतरणार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांत

या प्रकरणी माहिती अशी की, यातील फिर्यादी शिवाजी मारोती सोळंके याने फिर्याद दिली की, माजलगांव येथील हनुमंत नारायण सिरसट यांच्याशी माझी मुलगी कोमल हिचा विवाह दोन वर्षापूर्वी झाला होता. दिनांक 16 सप्टेंबर 2015 रोजी दुपारी 12.00 वाजण्याच्या सुमारास माझे मालक गौतम सोळंके याने मला फोन करून कळविले की, तुमची मुलगी कोमल ही जास्त भाजलेली असून उपचारासाठी शासकीय दवाखाना अंबाजोगाई येथे शरीक केले आहे.

सदर घटना समजल्यानंतर अंबाजोगाई येथील सरकारी दवाखान्यामध्ये गेलो. मुलीस पाहिल्यानंतर तीला विचारले असता, सासू शकुंतला नारायण सिरसट सतत टोचून बोलत असे. तू मोकार आहेस, असे म्हणून सतत संशय घेत होती. नेहमी शिवीगाळ करत होती. तसेच आज जास्त प्रमाणात बोलल्याने मला राग सहन झाला नाही. रागाच्या भरात घरात ठेवलेली रॉकेलची कॅन अंगावर ओतली व पेटवून घेतले. असा मृत्यूपूर्व जबाब पोलीसाकडे दिला होता.

फिर्यादीचे वडील शिवाजी मारोती सोळंके याने दिलेल्या तक्रारीवरूनमाजलगाव शहर पोलीस स्टेशन ठाण्यात गु.र.नं. 103/2015 नुसार कलम 306, 504, 498(अ), 34 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. सदर प्रकरणी माजलगाव शहर ठाण्यात गुन्हा नोंद झाला. तपासाअंती पोलीसांनी न्यायालयात चार्जसीट दाखल केले. आरोपीविरूध्द न्यायालयात साक्ष पुरावे झाले. पो.का. अभंग, डॉ. विश्‍वजित पवार यांच्या साक्ष महत्वाच्या ठरल्या. या प्रकरणात न्यायालयाने आरोपी शकुंतला सिरसट, व हनुमान नारायण सिरसट रा.मठगल्ली, माजलगाव यांना अतिरीक्त सत्र न्यायाधीश अरविंद एस. वाघमारे यांनी दोन वर्ष सक्त मजुरी व पाच हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास एक महिना साध्या कैदेची शिक्षा सुनावली.

या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने सहा. सरकारी वकील रणजीत वाघमारे व अजय तांदळे यांनी काम पाहिले तसेच अ‍ॅड नारायण गोले यांनी सरकारी पक्षास मदत केली. तपास अधिकारी म्हणून सहाय्यक पोलीस निरिक्षक देवकर यांनी काम पाहिले. तर वाव्हळकर यांनी सहकार्य केले.

error: Content is protected !!