गेल्या एका वर्षभरात आरबीआयने व्याजदरात मोठ्या प्रमाणात कपात केली आहे. फिक्स्ड डिपॉझिट वरील व्याजदरांवर देखील याचा परिणाम पाहायला मिळाला. असे असले ते सामान्य नागरिक विशेषत: ज्येष्ठ नागरिकांमध्ये एफडीला विशेष पसंती दिली जाते. गुंतवणुकीचा हा एक सोपा, सुरक्षित आणि कमी जोखीमेचा पर्याय मानला जातो. अशावेळी व्याजदरात कपात केल्याने एफडीच्या दरांवर देखील परिणाम होत आहे.
सध्याचा ट्रेंड पाहता, ज्येष्ठ नागरिकांसाठी एफडीवर सध्या 3 ते 5.4 टक्के या रेंजमध्ये व्याज मिळते आहे. दरम्यान तुम्हाला मिळणारा व्याजदर एफडीची रक्कम, कालावधी यांसारख्या अनेक गोष्टींवर अवलंबून असतो. सामान्यपणे ज्येष्ठ नागरिकांना इतर वयोगटातील नागरिकांपेक्षा 0.50 टक्के अधिक दराने एफडीवर व्याज मिळते.
कमी व्याज असतानाही आहेत एफडीचे अनेक फायदे
आर्थिक रिकव्हरी दरम्यान जरी व्याजदर कमी झाले असले, तरीही यातील गुंतवणूक घटवणे तसं अयोग्य आहे. कारण इतर अनेक बाबी लक्षात घेता एफडीमध्ये गुंतवणूक फायद्याची आहे. यामध्ये सुनिश्चित व्याज मिळते, गुंतवणुकीबाबत स्पष्टता असते. बँक एफडीची विशेष बाब म्हणजे यामध्ये उच्च लिक्विडिटी असते. अर्थात पैशांची आवश्यकता भासल्यास सोप्या पद्धतीने रक्कम उभी करता येते.
या बँकांमध्ये मिळतं आहे चांगलं व्याज
जना स्मॉल फायनान्स बँक 2 ते 3 वर्षाच्या FD वर 7.50 टक्के वार्षिक व्याज मिळते आहे. या स्मॉल फायनान्स बँकेचे नवीन एफडी दर 18 नोव्हेंबरपासून लागू झाले आहेत. सूर्योदर स्मॉल फायनान्स बँकेमध्ये देखील 3 ते 5 वर्षांच्या एफडीवर वार्षिक 7.50 टक्के दराने व्याज मिळते आहे. इंडसइंड बँकेमध्ये 1 ते 3 वर्षांच्या एफडी वर 7 टक्के आणि इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेमध्ये 2 ते 3 वर्षांच्या एफडीवर 7 टक्के दराने व्याज मिळते आहे.
याशिवाय डीसीबी बँकेमध्ये सर्वाधिक व्याजदर बँक 6.95 टक्के , आरबीएल बँकेमध्ये 6.95 टक्के, येस बँकेत 6.75 टक्के आहे. एयू स्मॉल फायनान्स बँकेत 2 ते 3 वर्षाच्या एफडीवर वार्षिक 6.75 टक्के दराने व्याज मिळते आहेत. उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेमध्ये 6.50 टक्के दराने आणि फिनकेअर स्मॉल फायनान्स बँकेमध्ये 6.50 टक्के दराने व्याज मिळते आहे.