प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली मिर्झापूर 2, तीन तास आधीच होणार प्रदर्शित

गेल्या कित्येक दिवसांपासून मिर्झापूरचे चाहते या पुढील भागाची आतुरतेने वाट पाहत होते. त्यामुळे ही सीरिज प्रदर्शित होण्यापूर्वीच ट्विटरवर #Mirzapur2 हा हॅशटॅग ट्रेण्ड झाला होता. अॅमेझॉन प्राइमवर गाजलेल्या ‘मिर्झापूर’ या वेब सीरिजचा पुढचा भाग म्हणजेच ‘मिर्झापूर 2’ (‘Mirzapur 2’) ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

हे वाचा : आता फोन उचलण्याआधीच समजणार, काय आहे काम?

विशेष म्हणजे ही सीरिज २३ ऑक्टोबर रोजी म्हणजे आज प्रदर्शित होणार होती. मात्र, ही सीरिज ठरलेल्या वेळेपूर्वी प्रदर्शित करण्यात आली. त्यामुळे आता अॅमेझॉन प्राइमवर या सीरिजचे सगळे एपिसोड आता प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

अॅमेझॉन प्राइमने बुधवारी ट्विट करत ‘मिर्झापूर 2’ ही सीरिज रात्री १२ वाजता म्हणजेच २३ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येईल असं सांगितलं होतं. तसंच ११.३० वाजता एका वॉच पार्टीचंदेखील आयोजन केलं होतं. मात्र, ‘मिर्झापूर 2’ ही ३ तासापूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीली आली या नव्या सीजनचे १० एपिसोड साधारणपणे ९ वाजण्याच्या दरम्यान अॅमेझॉन प्राइमवर अपलोड करण्यात आले होते.

‘मिर्झापूर 2’ च्या माध्यमातून पुन्हा एकदा पंकज त्रिपाठी, विक्रांत मैसी,अली फजल यांच्या उत्तम अभिनय पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे पहिल्या सीजनमध्ये बबलू पंडित( विक्रांत मेस्सी) आणि स्वीटी गुप्ता (श्रिया पिळगांवकर) यांचा मृत्यू होताना दाखविण्यात आला होता.

त्यामुळे या नव्या सीजनमध्ये या दोघांच्या मृत्यूचा बदला घेताना गुड्डू पंडित ( अली फजल) आणि गोलू ( श्वेता त्रिपाठी) हे दिसत आहेत. मात्र, नेमकं या सीरिजमध्ये काय होतं हे मिर्झापूर २ पाहिल्यानंतरच प्रेक्षकांच्या समजणार आहे. दरम्यान, ही सीरिज वेळेपूर्वी प्रदर्शित का झाली यामागच कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

मात्र, वेळेपूर्वी प्रदर्शित झाल्यामुळे प्रेक्षकांसाठी ही एकप्रकारची पर्वणी ठरली आहे. या सीरिजमध्ये पंकज त्रिपाठी, अली फजल,दिव्येंदु, श्वेता त्रिपाठी शर्मा, रसिका दुग्गल यांच्यासह विजय वर्मा, प्रियांशु पेंदौली, इशा तलवार हे नवे चेहरेदेखील प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.

error: Content is protected !!