अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ( Donald Trump) यांनी AstraZeneca ची लस वैद्यकीय चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात पोहोचली असून चाचणी पूर्ण होण्याच्या अगदी जवळ पोहोचली असल्याचं सांगितलं आहे. करोना संकट अद्यापही टळलं नसताना सध्या सर्वांचं लक्ष करोनाचं (Corona) लस कधी उपलब्ध होईल याकडे लागलं आहे. (AstraZeneca) ची लस करोनाविरोधात वापरण्यासाठी परवानगी मिळेल असा विश्वासही डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे. व्हाइट हाऊसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पीटीआयने यासंबंधी वृत्त दिलं आहे.
हे वाचा : या कर च्या जबरदस्त विक्रीमुळे मारुतीच्या कार विक्रीत 17% वाढ
“मला तुम्हा सर्वांना सांगताना आनंद होत आहे की, AstraZeneca ची लस तिसऱ्या वैद्यकीय चाचणीत पोहोचली आहे,” असं डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी बोलताना सांगितलं. करोना लस तयार करणाऱ्यांमध्ये AstraZeneca आघाडीवर आहे. यासोबतच Moderna आणि Pfizer यांची लसही तिसऱ्या टप्प्यात आहे.
पत्रकारांशी बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं की, अमेरिकेने (USA) काही महिन्यातच करोना लसीच्या बाबतीत प्रगती केली आहे. अन्यथा यासाठी कित्येक महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता होती. “अमेरिकेत आम्ही अशा गोष्टी करत आहोत ज्याचा इतर कोणी विचारही केला नव्हता. ही एक अशी प्रक्रिया आहे ज्याच्यासाठी कित्येक वर्ष लागली असती पण आम्ही काही महिन्यातच करुन दाखवलं,” असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
अमेरिकेने रेकॉर्ड टाइममध्ये करोना लसीवर प्रगती केल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं आहे. देशातील करोना रुग्णांचं प्रमाण ३८ टक्क्यांनी कमी झालं असल्याचंही ते म्हणाले आहेत.