ब्रिटनमध्ये Corona लसीची चाचणी थांबली परंतु भारतात संशोधन सुरूच

ब्रिटनच्या (Britain) ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी (Oxford University) आणि ब्रिटीश-स्वीडिश कंपनी AstraZeneca Plc ची ही लस कोरोना संकट रोखेल अशी अशा संपूर्ण जग बाळगून होते. ब्रिटनमध्ये या संदर्भात चाचणीलाही सुरुवात झाली होती. आणि या चाचणीनांही यश येत होते. दरम्यान तिसऱ्या टप्प्यातील चाचणीवेळी एका व्यक्तीला लस देण्यात आली होती. मात्र ही व्यक्ती आजारी पडली असून काही दुष्परिणाम जाणवले. या व्यक्तीला रुग्णालयातही दाखल करावं लागलं. त्यामुळे कोरोना लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी रोखण्यात आली आहे.

हे वाचा : आता या अभिनेत्रीने केली आत्महत्या

कोरोनाचा (Corona) संसर्ग रोखण्यासाठी प्रभावी समजली जाणाऱ्या (AstraZeneca) या कंपनीच्या लसीची चाचणी थांबवण्यात आली आहे. भारतातही (India) या लसीची (Vaccine) चाचणी सुरु होती. त्यामुळे आता या लसीची चाचणी थांबवण्यात आल्याने करोनाविरोधातील लढ्यात भारतासह जगाला मोठा धक्का बसला आहे. पण सिरम इन्स्टिट्यूटने (Syram Institute) मात्र आपलं संशोधन सुरु असल्याच स्पष्टीकरण दिल आहे.

विशेष म्हणजे भारतातही या लसीची चाचणी सुरु करण्यात आली होती. तसेच 2021 च्या आधीच लस तयार होईल अशी अपेक्षा होती. मात्र लसी संदर्भात ब्रिटनवरून आलेल्या वृत्तानुसार कोरोना लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी थांबवली गेली आहे. त्यामुळे आता सर्वच अपेक्षांवर पाणी फिरले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!