एसटी गल्लोगल्ली फिरुन गणेश मूर्ती संकलित करणार

धुळे | महानगर पालिकेनं यंदा कोरोनाचा धुळे शहरात असलेला प्रादुर्भाव पाहता पांझरा नदी पात्रात विसर्जन करण्यास मनाई केली. धुळे शहरातील विविध भागात महानगर पालिकेनं कृत्रिम तलाव निर्मिती केलीय. एकूण 37 ठिकाणी अशी व्यवस्था करण्यात आली आहे. त्याच महानगर पालिका बरोबर एसटी महामंडळाच्या 25 मालवाहू ट्रकची देखील मदत घेण्यात येणार आहे.

धुळे महानगर पालिका, एसटी महामंडळ, पोलीस विभाग या तिघांच्या संयुक्त विद्यमानं धुळे शहरातील 37 ठिकाणाहून एसटी महामंडळाच्या 25 मालवाहू ट्रकच्या माध्यमातून यंदा प्रथमच गणपती मूर्तीचं संकलन होणार आहे, अशी माहिती एसटी महामंडळ, पोलीस आणि महानगर पालिका यांनी संयुक्तरित्या घेतलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे.

शहरातील विविध भागात या मालवाहू ट्रक फिरून मूर्ती संकलन करणार आहेत. महानगर पालिकेनं भाड्यानं घेतलेल्या या 25 एसटी मालवाहू ट्रकची एकूण फी 87 हजार 500 रुपये महानगर पालिका एसटी महामंडळाला देणार असल्यानं यातून एसटीला उत्पन्न मिळणार आहे. असं असलं तरी ना नफा ना तोटा या तत्वानुसार एसटीच्या 25 मालवाहू ट्रकची भाडे आकारणी करण्यात आल्याची माहिती एसटीच्या धुळे विभागाच्या विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ यांनी दिलीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!