या प्रकरणात अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (urmila matondkar) हिने प्रतिक्रिया दिल्यानंतर कंगनाने तिचा सॉफ्ट पॉर्न स्टार म्हणून केलेला उल्लेख अनेकांना पटलेला नाही. त्यामुळे बॉलिवूडकरांनी आता कंगनाविरोधात मोहीमच हाती घेतली आहे.
हे वाचा : मोठा खुलासा होण्याची शक्यता: सुशांतची हत्या की आत्महत्या? उद्या होणार खुलासा
अभिनेत्री कंगना रणौत (kangana Ranaut) विविध कारणांमुळे तिच्यासमोर येणाऱ्यांवर टोकाची टीका करीत आहे. बॉलिवूडमधील नेपोटिज्मविषयी ती यापूर्वीही बोलत होती. आता तर मुख्यमंत्र्यांसह (CM) बॉलिवूडमधील मोठ्या कलाकारांवरही तिने टीकेची झोड उठवली आहे.
एका टीव्ही मुलाखतीत कंगना म्हणाली की, उर्मिला मातोंडकर यांना त्यांच्या अभिनयासाठी ओळखले जात नाही. ती म्हणाली की उर्मिलादेखील एक सॉफ्ट पॉर्न स्टार आहे. त्यांना त्यांच्या अभिनयासाठी अजिबातचं ओळखलं जात नाही. जर त्यांना तिकीट मिळू शकतं तर मला का नाही? अशा आशयाचे कंगनाने ट्विटदेखील केलं आहे. त्यानंतर उर्मिला मातोंडकर (urmila matondkar) हिच्या समर्थनासाठी बॉलिवूड (Bollywood) सेलिब्रिटी समोर येत आहेत. स्वरा भास्कर, अनुभव सिन्हा यांच्यासह अनेक जणांनी उर्मिलाला पाठिंबा दर्शविला आहे.
स्वराने आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे की, ‘प्रिय उर्मिलाजी, फिल्म मासूम, चमत्कार, रंगीला, जुदाई, दौड़, सत्या, भूत, कौन, जंगल, प्यार तूने क्या किया, तहजीब, पिंजर, एक हसीना थी या चित्रपटातील तुमचा दर्जेदार अभिनय आजही आठवतो. अभिनय आणि नृत्य कौशल्याने अनेकांना वेड लावलं आहे. खूप प्रेम..