अयोध्या येथे राम मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झाले. या जल्लोषात कोपरगाव येथे मुख्य रस्त्यावर फटाके फोडणाऱ्या सात जणांविरोधात यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या माजी प्रदेश पदाधिकारी व कार्यकर्त्यावर कोपरगाव शहर पोलिसात जमाव बंदी व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
जय मल्हार कॉम्प्लेक्स समोर विघ्नेश्वर चौक, येथे १२.४५ वाजण्याच्या सुमारास फटाके फोडून, पेढे वाटून जल्लोष करताना आढळून आल्या प्रकरणी सत्येन सुभाष मुंदडा,रविंद्र रामदास बारावके, सुशांत सुभाष खैरे, सोमनाथ जगन्नाथ आहिरे, कुणाल संतोष पवार, प्राजक्ता सुशांत खैरे, अमृता श्रीकांत खैरे या सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.