Bhojpuri actress Anupama Pathak committed suicide: सिनेसृष्टी हादरली! एकाच दिवसात दुसरी आत्महत्या;

कोरोन सुरु झाल्या पासून कलाकारांच्या  आत्महत्याचे सुरु झालेले सत्र काही थांबत दिसत नाही आहे.

भोजपुरी अभिनेत्री अनुपमा पाठक हिने आत्महत्या केली आहे. धक्कादायक म्हणजे तिने कधी नव्हे ते काही दिवसांपूर्वी फेसबुक लाईव्ह केले आहे. वृत्तसंस्था IANS ने याची माहिती दिली आहे. मुंबईतील तिच्या राहत्या फ्लॅटमध्ये गळफास लावून आत्महत्या केली आहे. दहिसरमधील तिच्या घरी तिचा मृतदेह पंख्याला लटकलेला होता. अनुपमा ही 40 वर्षांची अभिनेत्री एक दिवस आधीच फेसबुक लाईव्ह आली होती. तसेच तिने फॅन्ससोबत संवाद साधला होता.

फेसबुक लाईव्हमध्ये अनुपमाने कोणावर विश्वास ठेवू नका, असे सांगितले होते. तसेच तिला कशाप्रकारे फसविण्यात आले यावरही ती बोलली आहे. अनुपमाच्या फ्लॅटमधून एक सुसाईड नोटही सापडली असून यामध्ये तिने आत्महत्येची दोन कारणे सांगितली आहेत. ”माझ्या एका मित्राच्या सांगण्यावरून मी मालाडच्या विस्डम प्रोड्यूसर कंपनीमध्ये 10000 रुपये गुंतविले आहेत. कंपनी मला हे पैसे डिसेंबर 2019 मध्ये देणार होता. मात्र, आता टाळाटाळ केली जात आहे.” अनुपमाने या चिठ्ठीमध्ये मनीष झा चेही नाव घेतले आहे. 

अनुपमा यांनी झा याने लॉकडाऊनमध्ये माझी स्कूटर घेतली होती नंतर ती परत करण्यास नकार दिल्याचे म्हटले आहे. अनुपमा यांची शेवटची फेसबुक पोस्ट 2 ऑगस्ट रात्री 12 वाजताची आहे. तिने यामध्ये बाय बाय आणि गुड नाईट लिहिले आहे. 


Bhojpuri actress Anupama Pathak committed suicide

मनमाड हादरलं, झोपेतच एका कुटुंबातील चौघांचे गळे चिरून हत्या, 4 वर्षांचा मुलीचा समावेश

सहकारी महिलेवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याकडून अत्याचार; गुन्हा दाखल

शेतीच्या वादातून वासनवाडीत एकाचे डोके फोडले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!