बीड : वाळूच्या भरधाव टिपरने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तिघेजण जागीच ठार झाल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यातील काळवीट तांडाजवळ शनिवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली.
नागनाथ महादेव गायके (वय ३५), वसंत जनार्दन गायके (वय ४५) आणि विठ्ठल मुंजाजी गायके (वय २३) अशी अपघातातील मयत तरुणांची नावे आहेत. हे तिघेजण शनिवारी रात्री दुचाकीवरून (एमएच १३ बीडी ५६८४) गावाकडे निघाले होते. ते काळवीट तांडा परिसरात आले असता समोरून भरधाव वेगात येणाऱ्या वाळूच्या टिपरने (एमएच २५ यु २४४४) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता कि दुचाकीवरील तिन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच अंबाजोगाई ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरिक्षक महादेव राऊत यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली.