लंडन: जगभर कोरोनावर संशोधित होत असलेल्या पहिल्या टप्प्यातील सर्व लसी या ‘अपूर्ण’ असतील आणि त्या प्रत्येक व्यक्तीवर प्रभावी ठरणार नाहीत, असे मत युके वॅक्सिन टास्कफोर्सच्या अध्यक्षा केट बिंघम यांनी व्यक्त केलंय.
हे वाचा : महाराष्ट्रावर एकहाती भगवा फडकवायचा आहे, शिवसैनिकांनो सज्ज व्हा : उद्धव ठाकरे
यासंबधी मेडिकल क्षेत्रातील प्रतिष्ठित असलेल्या ‘द लॅन्सेट’ या नियतकालीकेत एक लेख लिहून त्यांनी हे मत मांडलंय. त्यांनी या लेखात पुढे असे लिहले आहे की, “पहिल्या टप्प्यातील बहुतेक वा सर्वच लसी या अपूर्ण असतील. त्या कोरोनापासून आपला बचाव करतील की नाही, ते सांगता येणार नाही. परंतु कोरोनाची लक्षणे काही प्रमाणात कमी करण्याचे काम त्या निश्चितपणे करतील. या लसी प्रत्येक व्यक्तीवर प्रभावीपणे काम करतीलच असेही नाही. तसेच त्यांचा प्रभाव दीर्घकाळासाठी टिकेल याचीही शाश्वती नाही.