पाकिस्तानमधील प्रसार माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, फुटबॉल (Football) सामना सुरू असताना दोन गटात जमिनीच्या वादातून गोळीबार झाला. यादरम्यान जुनैद आफ्रिदी (Junnaid Afridi) याला गोळी लागली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. (Afridi shot dead) गोळीबारात अन्य एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. मात्र गोळीबाराच्या घटनेत एका स्टार खेळाडूचा मृत्यू झाल्याने चाहत्यांनी दुःख व्यक्त केले आहे.
हे वाचा : मराठा समाज करणार ‘घरोघरी घंटानाद’
पाकिस्तानमधून (Pakistan) क्रीडा जगतात खळबळ उडवून देणारी बातमी आली आहे. दोन गटात झालेल्या वादात पाकिस्तानच्या स्टार खेळाडूचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानमधील खैबर जिल्ह्यातील जमरूद भागात ही घटना घडली आहे. यात पाकिस्तानच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाचा खेळाडू जुनैद आफ्रिदी याचा मृत्यू झाला. फुटबॉल सामना सुरू असतानाच त्याला गोळ्या घालण्यात आल्या.